कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यू…

0
128

तळेगाव दाभाडे दि. 8 – शिरगाव पोलीस चौकीत कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक दिलीप बोरकर ( वय 36 , मूळ नांदेड ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले . ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली .

दिलीप बोरकर यांना रविवारी सकाळपासून अस्वस्थ वाटत होते . त्यातूनही ते कर्तव्यावर हजर होते . दुपारी त्यांनी सहकाऱ्यांसोबत जेवण केले . त्यानंतर त्यांना खूप अस्वस्थ वाटू लागले . त्यामुळे ते चौकीतच थोडा वेळ झोपले . काही वेळेनंतर सहकारी पोलीस बोरकर यांना झोपेतून उठवण्यासाठी गेले आसता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.