Tuesday, February 27, 2024
Homeपुणेकसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत मविआ च्या रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय..

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत मविआ च्या रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय..

पुणे (प्रतिनिधी):कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत तब्बल 11 हजार 40 एवढ्या मताधिक्याने त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करून इतिहास घडवीला.
भाजप विरोधी मतांचे ध्रुवीकरण हे धंगेकर यांच्या यशाचे गणित म्हणावे लागेल. झालेल्या मतदानापैकी तब्बल 52.98 म्हणजेच 53 टक्के मते आपल्याकडे खेचण्यात धंगेकर यशस्वी ठरल्याचे पहायला मिळाले आहे.
भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना देखील 45.09 टक्के मते मिळाली आहे, मात्र निवडणूक रिंगणातील दोन प्रमुख उमेदवार वगळता उर्वरित 14 उमेदवारांना खूपच कमी म्हणजे 0.93 टक्के मते मिळाल्याने मतविभागणी झाली नाही. त्याचा मोठा फटका रासने यांना बसला.
रासने यांच्या विरोधातील बहुतांश मते थेट धंगेकर यांना मिळाल्याने त्यांच्या मतांची टक्केवारी 53 % पर्यंत वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
एकूण मतदारांपैकी एक टक्का म्हणजे 1401 मतदारांनी नोटा या पर्यायापुढील बटन दाबून सर्व उमेदवारांविषयी नापसंती व्यक्त केली आहे. दोन प्रमुख उमेदवार वगळता 14 उमेदवारांना मिळून एक टक्का मते देखील मिळवता आलेली नाहीत.
- Advertisment -

You cannot copy content of this page