मुंबई : अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी आज टिळक भवन दादर येथे निवडणूक पार पडली.
अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे व शशी थरूर हे दोन उमेदवार रिंगणात होते. सदर निवडणूकीत लोणावळा शहरातील काँग्रेस (आय) चे महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी नासीर शेख यांनी मतदान करून आपला हक्क बजावला.
नासीर शेख यांनी लोणावळा नगरपरिषद शिक्षण सभापती पदाची भूमिका पार पाडत असताना लोणावळा शहर नगरसेवक म्हणून त्यांनी निवडणुकीत बाजी मारली तर लोणावळा शहरातील काँग्रेस कमिटीचे कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच संयमी, अनुभवी व प्रेमळ स्वभाव यामुळे सर्व परिसरातील कार्यकर्त्यांचे चाहते नेतृत्व बनले आहेत.