Friday, February 23, 2024
Homeपुणेमावळकान्हे फाटा येथे चालत्या कंटेनरला आग, केबिन जळून खाक..

कान्हे फाटा येथे चालत्या कंटेनरला आग, केबिन जळून खाक..

मावळ (प्रतिनिधी):पुणे-मुंबई महामार्गावर कान्हे फाटा येथे एका कंटेनरला अचानक आग लागुन केबिन पूर्ण पणे जळून खाक झाली आहे.ही घटना मंगळवार दि. 5 रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जुना पुणे मुंबई महामार्गावरून जात असलेल्या एका कंटेनरला कान्हे फाटा येथे अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपला मित्र मावळ टीम तसेच अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
हा कंटेनर मुंबईहून पुण्याला जात होता.तनिष्का हॉटेलच्या समोर कंटेनरच्या इंजिन मध्ये अचानक आग लागली. यामध्ये कंटेनरची केबिन जळून पूर्णपणे खाक झाली आहे. या घटनेत एका दुचाकीचे देखील नुकसान झाले असून यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
- Advertisment -

You cannot copy content of this page