Friday, June 9, 2023
Homeपुणेमावळकान्हे फाटा येथे रेल्वेच्या धडकेने 60 वर्षीय अज्ञात महिलेचा मृत्यू…

कान्हे फाटा येथे रेल्वेच्या धडकेने 60 वर्षीय अज्ञात महिलेचा मृत्यू…

मावळ (प्रतिनिधी): कान्हेफाटा हद्दीत अज्ञात रेल्वे च्या धडकेने एका 60 वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दि.11 रोजी कान्हे फाटा रेल्वे स्टेशन जवळ घडली.
कान्हेफाटा येथे रेल्वे कि. मि.152/37 जवळ अज्ञात रेल्वे गाडीच्या धडकेने अनोळखी महिला वय अंदाजे 60 वर्ष हीचा मृत्यू झाला आहे.तीचे नाव व पत्ता माहिती नसल्याने तीचे वर्णन पुढील प्रमाणे आहे.- अंगाने मजबूत, रंग गोरा, उंची 5 फूट, नाक सरळ, गोल चेहरा, काळे पांढरे केस असे असून अंगात लाल रंगाचा ब्लाउज व भगव्या रंगाची साडी नेसलेली आहे.
सदर महिला ही परिसरातील ओळखीची असल्यास पुणे रेल्वे पोलीस प्रशांत संपत जाधव मोबाईल क्र.8888010100 यावर संपर्क साधावा असे आवाहन पुणे रेल्वे पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page