Wednesday, May 29, 2024
Homeपुणेकामशेतकामशेत नायगाव येथे दोन गटात हाणामारी, तीन जण गंभीर जखमी तर दहा...

कामशेत नायगाव येथे दोन गटात हाणामारी, तीन जण गंभीर जखमी तर दहा जण अटकेत….

कामशेत( प्रतिनिधी ): नायगाव येथे दोन टोळक्यात तुफान हाणामारी झाली असून यामध्ये एकमेकांवर कोयत्याने व दगडाने मारहाण करत फायरींग देखील केली आहे. हा प्रकार सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला .

कामशेत पोलीस ठाण्यात सोमनाथ उर्फ स्वामी गायकवाड व आकाश शंकर लालगुडे यांनी एकमेकांच्या विरोधात मंगळवार दि.27 रोजी पहाटे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेत योगेश अनंता गायकवाड, प्रमोद सोपान सांडभोर, मंगेश भीमराव मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नायगाव हद्दीत नवनाथ नथु चोपडे यांच्या घरासमोर किरकोळ वाद मिटविण्यासाठी आलेल्या 11 जणांसह इतर तसेच उपस्थित 10 जणांसह इतर यांच्यात किरकोळ वादातून दोन टोळ्यांमध्ये कोयत्याने दगडाने व पिस्तुलमधून फायरिंग करून तुफान हाणामारी झाली. यात देवा गायकवाड यांचा भाऊ योगेश गायकवाड यांच्या डोक्याला व हाताला गंभीर जखमा झाल्या. तसेच प्रमोद सांडभोर व मंगेश मोरे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

किशोर आवारे यांच्या सांगण्यावरून हे भांडण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, त्यांच्यासोबत संपर्क केला असता, या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसून माझे नाव मुद्दाम गोवण्यात आले आहे, तरी पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आवारे यांनी सांगितले.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय जगताप हे करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page