मावळ (प्रतिनिधी): दिवाळी सणाचे औचित्य साधत कामशेत पोलीस स्टेशनच्या वतीने एकता निराधार संघ कामशेत या संस्थेत अन्न धान्य व संस्थेतील मुलींसाठी सॅनिटरी पॅड चे वाटप करून दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला.
पोलीस मित्र हे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना आपल्या कुटुंबासोबत सन साजरा करता येत नसला तरी आपल्या कर्तव्याचे ठिकाण हेच आपले कुटुंब याचे अनोखे उदाहरण कामशेत पोलिसांकडून देण्यात आले आहे.अनेक सणा सुदीला आपल्या परिवारासोबत सण साजरा करता येत नाही.
तर खाकी वर्दी मध्येही एक माणूस असल्याच्या भावनेतून कामशेत येथील एकता निराधार संघ या संस्थेत अन्न धान्य देऊन, येथील भगिनींना सॅनिटायझरी पॅड वाटप करण्यात आले.
सदर उपक्रम हा सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस शिपाई अमोल ननवरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला आहे. कामशेत पोलिसांनी राबविलेला उपक्रम प्रशंसनीय असल्याने यावेळी संस्थेच्या वतीने कामशेत पोलीसांचे आभार व्यक्त करण्यात आले.