Thursday, December 26, 2024
Homeपुणेकामशेतकामशेत पोलिसांची मोठी कामगिरी,कामशेत रेल्वे स्टेशनवर झालेल्या खुनातील आरोपी एका तासातच जेरबंद…

कामशेत पोलिसांची मोठी कामगिरी,कामशेत रेल्वे स्टेशनवर झालेल्या खुनातील आरोपी एका तासातच जेरबंद…

मावळ (प्रतिनिधी):कामशेत रेल्वे स्टेशनवर आज रविवार, दि. 23 रोजी दुपारच्या सुमारास हत्या झालेल्या स्वरुपात आढळलेल्या युवकाच्या मारेकऱ्याचा तपास अवघ्या एका तासात लावण्याची कामगिरी कामशेत पोलिसांनी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कामशेत रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मच्या कठाड्यावर एक 22 ते 25 वयोगटातील व्यक्तीचा खून करून मृतदेह मृत अवस्थेत मिळाला होता. सदर मयताचा आणि त्याचा खून करणाऱ्या आरोपीचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक संजय जगताप,सहाय्यक फौजदार अब्दुल शेख,सहाय्यक फौजदार समीर शेख, पोलीस हवालदार गणेश तावरे,सुहास सातपुते,एस डोईफोडे, होमगार्ड सुधीर घारे या पथकाने शीघ्रगतीने केला.

पथकाने अवघ्या एका तासात मारेकरी आरोपी संतोष महादेव घाटे (सध्या राहणार फिरिस्ता कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे, मुळगाव अमरावती) याला कामशेत परिसरात शोध घेऊन शिताफीने ताब्यात घेतले. तसेच त्याच्यासोबत इतर दोन साथीदार असल्याबाबत समजत आहे. तसेच खून झालेल्या व्यक्तीची तात्काळ व्हाट्सअप वर आणि मोबाईलवर सर्वत्र माहिती पाठवून त्याची ओळख पटवण्यात आली आहे.
सदर खून झालेल्या व्यक्तीचे नाव विजय सतू भोंडवे (वय 22,रा.भाजगाव गाव,तालुका मावळ, जि पुणे) असे आहे. त्याबाबत आरपीएफ पोलीस स्टेशन चिंचवड या ठिकाणी गुन्हा दाखल होत आहे. आरोपी संतोष महादेव घाटे यास स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग पुणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. सदर खुनाचा पुढील तपास आर पी एफ हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page