Friday, February 23, 2024
Homeपुणेकामशेतकामशेत येथे पतिनेच केला पत्नीचा खून, घरगुती वादातून घडली घटना…

कामशेत येथे पतिनेच केला पत्नीचा खून, घरगुती वादातून घडली घटना…

कामशेत (प्रतिनिधी): कामशेत येथे कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून पतीनेच निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना काल रविवार दि. 8 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कामशेत ता. मावळ येथे घडली.
मयुरी दशरथ शिंदे (वय 38, रा. कामशेत, रॉयल चायनीजच्या मागे, ता. मावळ) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती दशरथ विठ्ठल शिंदे (वय 43, रा. कामशेत, रॉयल चायनीजच्या , मागे, ता. मावळ) यास अटक करण्यात आली असून त्याच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत ( ता. मावळ) येथे आरोपी दशरथ शिंदे याने कामशेत शहरातील आपल्या राहत्या घरी झालेल्या कौटुंबिक वादाचा राग मनात धरून आपल्या पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार केले. काल रविवार दि.8 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत मयुरी शिंदे यांचा मृत्यू झाला. गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने दि. 13 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
दरम्यान, घटनास्थळी लोणावळा विभाग सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पो.सइ. शुभम चव्हाण, यांनी भेट दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page