Monday, March 4, 2024
Homeपुणेकामशेतकामशेत रेल्वे स्टेशन जवळ एक्सप्रेस रेल्वेच्या धडकेने वृद्ध अनोळखी इसमाचा मृत्यू…

कामशेत रेल्वे स्टेशन जवळ एक्सप्रेस रेल्वेच्या धडकेने वृद्ध अनोळखी इसमाचा मृत्यू…

कामशेत (प्रतिनिधी): कामशेत रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत अनोळखी वृध्द व्यक्तीचा मृत्यू झाला आहे . काल शुक्रवार दि.4 रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली.
कामशेत रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र. दोन कडून लोहमार्ग ओलांडताना अप लाईनवरून आलेल्या प्रगती एक्सप्रेसची धडक बसल्याने हा अपघात झाला.
लोहमार्ग पोलीस अनिल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार , कामशेत येथे एक अनोळखी वृध्द व्यक्तीचा वय अंदाजे 65 ते 70 कामशेत रेल्वे स्थानकावर लोहमार्ग ओलांडताना कि . मी 143 / 41-43 दरम्यान शुक्रवारी सकाळी 8:45 च्या सुमारास प्रगती एक्सप्रेस ( गाडी क्र.12126 ) या गाडीची जोरदार धडक बसून जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस अनिल जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह खंडाळा प्राथमिक उप आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठण्यात आला आहे.
सदर इसम हे अनोळखी असून वय अंदाजे 65 ते 70 वर्ष, उंची 5/6 इंच, अंगाने सडपातळ,रंग गौवर्निय, नाक बसके, दाढी मिशी पांढरी व वाढलेली असे वर्णन आहे. मयताच्या अंगावर सफेद पायजमा शर्ट, आत कोपरी असे कपडे परिधान केलेले आहेत. तरी सदर अनोळखी मयताची ओळख पटल्यास लोहमार्ग पोलीस ए. डी.जाधव यांच्याशी संपर्क साधावा.
- Advertisment -

You cannot copy content of this page