Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन व उदघाटनांची घौडदौड सुरूच !

कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन व उदघाटनांची घौडदौड सुरूच !

कर्जत तालुक्यातील सावेळे जि. परिषद विभागातील विकास कामांचा झंझावात..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत – खालापूर मतदार संघात विरोधी पक्षात धुसफूस – कुरघोडी – अंतर्गत कलह – टिपा – टिप्पणी – आरोप – प्रत्यारोप – मिश्किल बोलणे – हेवे – दावे – एकमेकांविरोधात शाब्दिक चकमक सुरू असताना येथील कार्यसम्राट आमदार मात्र विकासकामांचे भूमिपूजन व केलेल्या कामांचे उदघाटन , लोकार्पण सोहळे पार पडण्यात गुंतलेले असतानाचे चित्र सध्या येथे पाहण्यास मिळत आहेत . सावेळे जिल्हा परिषद वार्ड मधील विकास कामांचा भूमिपूजन व उदघाटन समारंभ रविवार दि . ५ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते पार पडले.
या विविध विकास कामांत करोडो रुपयांच्या विकास कामांना प्राधान्य दिले असून यामुळे या भागातील परिसरांचा कायापालट होणार आहे . यांत वावलोली ग्रा.पंचायत हद्दीतील भातगाव ते वडवली रस्ता तयार करणे – भूमिपूजन , नसरापूर हद्दीतील चांधई ते वडवली रस्ता तयार करणे – भूमिपूजन , सालवड ते लहान चांधई रस्ता तयार करणे – उदघाटन , नसरापूर हद्दीतील नसरापूर ते लहान चांधई रस्ता तयार करणे – उदघाटन , वाकस हद्दीतील वाकस ते मिरचोली रस्ता तयार करणे – भूमिपूजन , वाकस – मिरचोली – कळंबोली रस्ता तयार करणे – भूमिपूजन , वाकस ते चोरावळे रस्ता तयार करणे – भूमिपूजन , जिते हद्दीतील वाकस पूल ते कुंभे रस्ता तयार करणे – भूमिपूजन , नालधे – बोरिवली – अंजप – कडाव रस्ता दुरुस्ती करणे – भूमिपूजन , बोरिवली हद्दीतील नालधे – बोरिवली – अंजप – कडाव रस्त्यावरील पेज नदीवर पूल बांधणे – भूमिपूजन , आदी कामाचे कार्यक्रम पार पडले.
या प्रसंगी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या समवेत , शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी विधानसभा संघटक संतोषशेठ भोईर , तालुका प्रमुख संभाजी जगताप , तालुका संघटक सुनील रसाळ , अनंत धुळे , संतोष कोळंबे , हर्षद विचारे , प्रफुल्ल म्हसे , दिलीप ताम्हाणे , रामचंद्र मिणमिणे , नितीन धुळे , अंकुश दाभणे , संतोष मुने , सनी चव्हाण , नसरापुर सरपंच साक्षी संतोष मोहिते , सरपंच संजय तांबोळी , विनायक घरत , अतिश भोईर , उत्तम तिखंडे , दशरथ देशमुख , देविदास बागडे , जितेंद्र दळवी , गणेश शेलार आदी मान्यवर , मोठया प्रमाणात शिवसैनिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page