Wednesday, June 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे कार्य बघूनच राष्ट्रवादी काँग्रेसला झाली पोटदुखी !

कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे कार्य बघूनच राष्ट्रवादी काँग्रेसला झाली पोटदुखी !

जशास तशे उत्तर देण्यास शिवसेना देखील तयार…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेली गर्दी बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे , आपल्या गाव खेड्याकडे आपली बोली भाषाच तशी असल्याने आमदार साहेबांच्या विधानाचा विपर्यास करू नये , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने केलेले आरोप , व विधान बिनबुडाचे असून अदितीताई तटकरे या आमच्या ” भगिनी ” च आहेत , असे विधान शिवसेनेचे जेष्ठ नेते संतोषशेठ भोईर यांनी ” बाळासाहेब भवन ” येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले.
राजकीय क्षेत्रात काम करत असताना आमदार महेंद्रशेठ थोरवे हे वेगळ्या पद्धतीने काम करत आहेत , कडक आहेत , मात्र अनादर करण्याचा त्यांचा कुठलाही हेतू नव्हता , वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा करताना आलेला जनसमुदाय हा त्यांच्या प्रेमापोटी आलेला होता , या स्वच्छ भावनेचा देखील वाईट हेतू काढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांच्या पोटात का , दुखू लागले , हे झालेल्या गर्दी वरून तर नाही ना ? असा सवाल त्यांनी उपस्थित करून , तुम्ही देखील कार्यक्रम करता तुम्ही जमवलेली गर्दी देखील तशीच असते का , असा प्रती सवाल त्यांनी घारे यांच्यावर लगावला.शिवाय कामे करत असताना शासकीय अधिकारी वर्गावर वचक असल्यानेच कामे होत असतात , यापूर्वी आलेली मरगळ आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी घालवली , अनेकांचा पक्ष प्रवेश हा देखील त्यांचे उल्लेखनीय कार्य बघूनच होत आहे , म्हणून अश्या पत्रकार परिषद घेऊन आमदार साहेबांचे कार्य रोखू शकत नाहीत , राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आरोप बिनबुडाचे असून , चुकीचा अर्थ काढून येथील राजकीय वातावरण खराब करू नका , अन्यथा आम्ही देखील जशास – तसे उत्तर देऊ , असा घणाघाती प्रहार शिवसेनेचे जेष्ठ व डॅशिंग नेते संतोषशेठ भोईर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला.

शिवसेना संपर्क कार्यालय ” बाळासाहेब भवन ” येथे पत्रकार परिषदेचे आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते . यावेळी उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , जेष्ठ नेते उल्हास भुरके , संतोषशेठ भोईर , पंकज पाटील ,संघटक शिवराम बदे , ता. प्रमुख संभाजी जगताप , खालापूर ता.प्रमुख संदेश पाटील ,युवा सेना अध्यक्ष अमर मिसाळ , संतोष ताम्हाणे , सनी चव्हाण , एकनाथ मते , नगरसेवक संकेत भासे , कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते .तर संघटक पंकज पाटील यांनी सांगितले की , बचत गटाच्या माध्यमातून शासन – प्रशासन महिला सक्षमीकरण करण्यासाठी योजना आणून , त्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आमदार महेंद्रशेठ थोरवे प्रयत्न सुरू आहेत म्हणूनच बचत गटाच्या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी उपस्थित होते , याचा खुलासा करत , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला हा खोडसाळ मुद्दा त्यांनी खोडून काढला.

तर शिवराम बदे यांनी विरोधकांवर प्रतिहल्ला करत कुटुंब वत्सल म्हणून महाराष्टात तटकरे प्रसिद्ध आहेत , शासकीय कामात खोडा , श्रेय घेणे , शासकीय अधिकारी वर्गावर दबाव आणणे , म्हणूनच पालकमंत्री हटाव मोहीम ही कर्जतमधून राबविली गेली , मात्र येथील राष्ट्रवादी च्या नेत्यांचे ” दिवा स्वप्न ” भंग झाल्यानेच हास्यास्पद पत्रकार परिषद घेतल्याचे त्यांनी सांगितले.पदाचा व दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून ज्यांनी अधिकार दिले त्यांनाच गाडायचा प्रयत्न ते त्यांच्या कृतीतून त्यांच्या नेत्यांचे करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
जेष्ठ – थोरा मोठयांच्या समोर लहानांनी मोठेपणा केला तर त्याला शेंबडा मुलगा आहेस , असेच बोली भाषेत बोलतात , यात वावगे काय आहे , मात्र आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी पत्रकार परिषदेची ही खेळी आहे ,अशी कोपरखळी त्यांनी मारत आपल्या जेष्ठ नेते सुरेशभाऊ लाड यांना किती अपमानित करता , यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला . राजिप चे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती असताना ” गणवेश घोटाळा ” यांच्या सत्तेत घडले , शेट्टी जमीन लाटल्याचे प्रकरण , हे देखील यांच्याच सत्तेत घडले , म्हणूनच स्वताला सावरा , नाहीतर आम्ही ” जशास तशे उत्तर देऊ ” , असा ईशारा देखील शिवराम बदे यांनी विरोधकांना दिला.

कर्जत ता.प्रमुख संभाजी जगताप यांनी सांगितले की , तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी तालुक्यातील कामे मंजूर करून आणली आहेत , तर आता देखील १६० कोटींची कामे बजेट मधून अधिवेशनात मंजूर केली आहेत , बजेट अधिवेशन झाल्यावरच ते बाहेर फिरायला गेले , विकासाला पाठींबा जनतेचा मिळत आहे , ह्यांना बघवत नाही , असा प्रतिहल्ला करत विरोधकांचा आरोप त्यांनी खोडून काढला .
उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांनी आमच्याशी वाकड्यात जाल , तर आम्हीही वाकड्यात जाऊ ,असा ईशारा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला . एकंदरीत कर्जत – खालापूर मतदार संघाचे शाब्दिक वातावरण ऐन गर्मीत चांगलेच तापले असून या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी धुडकारले.
- Advertisment -

You cannot copy content of this page