Friday, February 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते " दर्गाह " रस्त्याचे लोकार्पण..

कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते ” दर्गाह ” रस्त्याचे लोकार्पण..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” शब्द तुमचा , विकास आमचा ” , या माध्यमातून शिवसेना कर्जत शहर संघटक नदीम भाई खान यांनी मांडलेल्या विकास कामांच्या सूचनेनुसार ” दर्गाह ” रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे या कामाला योग्य निधी पुरवून गती मिळाल्याने उल्हास नदी किनारी उद्याचे विकसित होणारे ” पर्यटन स्थळाचे ” कर्जत नगर परिषद हद्दीतील शनी मंदिर ते दर्गाह सिमेंट काँक्रिट रस्त्याचे गुरुवार दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ – ०० वाजता कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा करण्यात आले.

यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी , मुख्याधिकारी वैभव गारवे , नगरसेवक संकेत भासे , उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , नगर अभियंता मनीष गायकवाड , भाजपा कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत , जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे , भाजपाचे नेते सुनील गोगटे , नितीन कांदळगावकर , शिवसेना कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप ,संघटक पंकज पाटील , नगरसेविका प्राची डेरवणकर , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , या सर्वांचे शाल – पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . तर या लोकार्पण सोहळ्यास योगेश राठी , नारायण जूनगरे , उपसंघटक सचिन खंडागळे , आकिब पाटील , उपशहर प्रमुख दिनेश कडू , वैभव सुरावकर , सईदु शेख , यूसुफ खान , अमीन कोतवाल , हामिद खैराट , आरिफ चौगूले , इमरान मुल्ला , इरफान खलीफा , गुलाब भाई , शकील शेख , फैसल ईद्रूस , मौजम पानसरे , वसिम मुकरि , नवीद खान , अमीर मनियार , नवाज़ तांबोळी , इमरान पठाण, नदीम कुरेशी , अख्तर करनेकर , फारुख मुल्ला , रहीम शेख , इरफान मुल्ला , सैफुवन चौगुले , फिरोज मुल्ला , फरमान मुल्ला , अर्शद शेख़ , उबेद शेख , फिरोज शेख , रफीक शेख , निशार शेख , नईम शेख , ऐश भोसले , अथर्व बडेकर , व या रस्त्याचे स्वप्न उराशी घेऊन काम करणारे शिवसेना शहर संघटक नदीम भाई खान त्याचप्रमाणे अनेक मान्यवर व मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते.

कर्जत न. प. हद्दीतील ” इशुब शाह बाबा दर्गाह ” त्याचप्रमाणे मुस्लिम समाज ” कब्रस्तानचा ” रस्ता गेली अनेक वर्षे सुस्थितीत नव्हता . म्हणूनच ” जिंदगी के आखरी सफर का , अंतिम रास्ता ” व्यवस्थित होणे गरजेचे आहे , असे मुस्लिम समाजाचे युसुफ खान यांची इच्छा असल्याने कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे कट्टर समर्थक शहर संघटक नदीम भाई युसुफ खान यांनी हा रस्ता होणे करिता आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या कडे शब्द टाकला , व पाठपुरावा केला , हा शब्द त्यांनी मनावर घेवून निधी उपलब्ध करुन देत ” ना नफा , ना तोटा ” , या तत्त्वावर नदीम भाई खान यांनी स्वतः लक्ष घालून अतिशय ” वाखानण्याजोगे ” काम करत आज त्या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.
एकूण ४०० मीटर रस्त्याचे काम त्यांनी या आमदार निधीतून पार केले , तर उर्वरित शनी मंदिर पर्यंत असाच सिमेंट काँक्रिट चां रस्ता होण्यास निधी उपलब्ध करून दिल्यास उल्हास नदीच्या बाजूला होणाऱ्या गार्डन व इतर सुशोभीकरण कामामुळे भविष्यात हा परिसर ” पिकनिक स्पॉट , ज्येष्ठ नागरिक , व नागरिकांना मोर्निंग वॉक ” पॉइंट बनेल , अशी मागणी शिवसेना शहर संघटक नदीम भाई युसुफ खान यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्याकडे मांडली आहे. एकूण १ करोड च्या आसपास निधी मंजूर करून हा रस्ता बनविला असल्याचे शहर संघटक नदीम भाई खान यांनी सांगितले , तर बोहरी समाजाचे व गार्डनचे काम देखील लवकरच मार्गी लागेल , असे मत व्यक्त करत नगरसेवक संकेत भासे यांना सर्व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा संघटक नदीम भाई खान यांनी दिल्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page