कार्ला गावातील एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांचा डाव लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लावला उधळून… एकास अटक

0
618
लोणावळा : कार्ला गावातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या इमारतीत असलेले एटीएम मशीन फोडण्याचा डाव उधळून लावत पाठलाग करून एकास अटक करण्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दि. 6, रोजी पहाटे 2:30 वा. सुमारास एक बोलेरो गाडी बँक ऑफ महाराष्ट्रा समोर येऊन थांबली त्यामधून चारजण खाली उतरून तिथे ड्युटीवर असलेल्या सेक्युरिटी गार्ड अशपाक अहंमद शेख ( वय 37) याला धारदार चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली असता शेख ह्याने आपला जीव वाचवत तेथून कार्ला गावाच्या दिशेने धाव घेतली व आरडाओरडा केला त्यावेळी कार्ला गावातील ग्रामसुरक्षा दलाचे दोन जवान येताच लोणावळा ग्रामीण पोलिसांचे गस्तावर असलेले पोलीस पथक तिथे वेळीच आले.
मशीन फोडण्याकरिता आलेल्या चार जणांपैकी दोघे बोलेरो गाडीच्या जवळ उभे होते. त्यांची नजर पोलिसांच्या वाहनाकडे जाताच त्या दोघांनी गाडीसह पळ काढला आणि मशीन फोडणारे दोघेजण अंधाराचा फायदा घेत झाडाझुडपात पळाले असता लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रनवरे, पोलीस हवा. आशिष काळे, पोलीस नाईक प्रणय उकिर्डे व कार्ला ग्रामसुरक्षा दलाचे अनिकेत पाटील, पवन म्हाळस्कर यांनी पाठलाग करून सराईत आरोपी तिलकसिंग त्रिलोकसिंग टाक ( वय 39, रा. हडपसर, पुणे ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कॉवत यांच्या पथकाने कामशेत येथून बोलेरो गाडी ताब्यात घेतली. तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे.