Thursday, September 28, 2023
Homeपुणेमावळकार्ला गावातील गौरी व पाच दिवसीय गणरायाला भावपूर्ण निरोप..

कार्ला गावातील गौरी व पाच दिवसीय गणरायाला भावपूर्ण निरोप..

कार्ला दि.14 : सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पाश्वभुमीवर गणरायाला निरोप देताना कुठल्याही प्रकारची मिरवणुक न काढता गर्दी न करता मर्यादित भक्त “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया,पुढच्या वर्षी लवकर या”अशी विनवनी करत तसेच एक दोन तिन चार कोरोनाला करु हद्दपार अशा घोषणा देत गणेशभक्तानीं मंगलमय वातावरणात या वर्षी आलेल्या पाच दिवसांच्या गणपती व गौरींना भावपूर्ण निरोप देण्यात आला, आत्तापर्यंतच्या इतिहासातील हा कार्ला गावातील पहिलाच गणेश विसर्जन सोहळा असेल तो दोन तासात पार पडला.


कार्ला परिसरातील मळवली, भाजे, पाटण, बोरज, देवले, वेहेरगाव, दहिवली, शिलाटणा, वाकसई देवघर, सदापूर या ग्रामीण भागातील घरोघरी बसलेले गणराय हे बहुतांशी गौरी विर्सजनाबरोबर त्यांना निरोप दिला गेला.


विशेष म्हणजे या वर्षी लोणावळा ग्रामीण पोलिसस्टेशनचे पोलिस निरिक्षक प्रविण मोरे,सहाय्यक निरीक्षक सचिन बनकर बीट अमंलदार गणेश होळकर,पोलिस पाटील संजय जाधव यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गर्दी टाळण्यासाठी कार्ला येथील गावातील घरोघरी बसलेल्या गौराई व गणपती विसर्जनासाठी कार्ला ग्रामपंचयात व कार्ला ग्रामस्थांकडून संपूर्ण गावामध्ये जनजागृती करत चार टॕंम्पो व टॕक्टर फिरवून सर्व गौराई व गणपती टॕंम्पोमध्ये ठेऊन सर्व गौराईं गणपती यांचे धार्मिक पध्दतीने पुजा करुन फक्त दोन तासात युवकांनी गणपती व गौराईचे विसर्जन करण्यात आले.एकही महिला व लहान मुले विसर्जन घाटावर आले नव्हते.

- Advertisment -