Thursday, January 16, 2025
Homeपुणेमावळकार्ला गावात श्रीकृष्ण जयंती निमित्त हरिपाठाचे आयोजन...

कार्ला गावात श्रीकृष्ण जयंती निमित्त हरिपाठाचे आयोजन…

कार्ला – प्रतिनिधी दि. 30:
कार्ला गाव व परिसरातील गावांमध्ये श्रीकृष्ण जयंती धार्मिक कार्यक्रमाणे उत्साहात साजरी करण्यात आली.
अनेक वर्षांपासून च्या परंपरेनुसार गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन यावेळी केले जात असत.

परंतु मागील दोन वर्षा पासून कोरोना प्रादुर्भावाचा विचार करुन व कोरोनाचे शासकीय नियम लक्षात घेऊन एक दिवस हरीनाम सप्ताहाचे आयोजन करुन सकाळी विधिवत श्रींची पूजा, विना पूजन करण्यात आले त्यानंतर सायंकाळी सहा वाजता हरिपाठाचे आयोजन ग्रामस्थांकडून करण्यात आले होते.

यावेळी खबरदारी म्हणून कार्ला ग्रामस्थांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन कडून परवानगी घेऊन रात्री कार्ला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करत श्री कृष्ण जयंती शांततेत साजरी करण्यात आली.

- Advertisment -

You cannot copy content of this page