Friday, November 22, 2024
Homeपुणेमावळकार्ला परिसरात गणरायाचे जयघोषात आगमन..

कार्ला परिसरात गणरायाचे जयघोषात आगमन..

कोरोनाच्या पाश्वभूमीवर ढोलताशांच्या गजर थांबला..

कार्ला- मावळ (प्रतिनिधी- गणेश कुंभार .22 आॅगस्ट 2020) कोरोना महामारी असताना देखील साधेपनाने का होईना गेल्या अनेक दिवसांपासून  गणेशभक्त आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागताची तयारी व प्रतिक्षा करत होते.


आज तो दिवस आला परंतु कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता यावर्षी गणराज्याचे स्वागताला ढोलताशांच्या गजर मात्र घूमला नाही.गुलालाची उधळन नव्हती,फटाक्यांची अतीषबाजी नाही. कार्ला,दहीवली वेहरगावी ,शिलाटने ,मळवली,भाजे,पाटण,देवले,वाकसई,बोरज,टाकवे या ठिकाणी गणरायाच्या जयघोषाच्या गजरात गणरायाचे आगमन झाले.सकाळ पासुनच घरगुती गणरायाचे आगमन सुरु झाले. घरातील सर्व सदस्य एकत्र येऊन गणेशाचे स्वागत करत होते घरातील छोटी मंडळी ‘गणपती बप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया’ जयजयकार करत गणपती चे स्वागत करत होते. 


घरातील गणपतीची प्राणप्रतिष्ठा  झाल्यानंतर  कार्ला गावातील एक गाव एक गणपती या उपक्रमा नुसार गावातील मारुती मंदिरात दुपारी १, ३० वाजता ‘गणपती बप्पा मोरया’ जयघोष करत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.तसेच कार्ला येथील संत रोहिदास तरुण मंडळाच्या गणरायाचे  टाळ मृदुगांच्या गजर व गणपती बप्पा मोरया म्हणत स्वागत करण्यात आले.

- Advertisment -

You cannot copy content of this page