कार्ला प्रतिनिधी दि.15 – आज कार्ला परिसरात 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री एकविरा विद्या मंदीर व श्रीमती लाजवंती हंसराज गृप्ता ज्युनियर काॅलेज येथे कार्ला गावचे विद्यमान उपसरपंच किरण हुलावळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले तर ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच दिपाली हुलावळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
या वेळी कार्ला गावच्या सरपंच दिपाली हुलावळे उपसरपंच किरण हुलावळे, ग्रा स भारती मोरे , सनी हुलावळे, सागर जाधव , सोनाली मोरे , उज्वला गायकवाड, सचिन हुलावळे, वस्तला हुलावळे, मा .रा काॅ चे कार्यअध्यक्ष दिपक हुलावळे, ग्रामसेवक सुभाष धोत्रे, कार्ला गावचे पोलीस पाटील संजय जाधव, सुनील सावळे, सागर हुलावळे, अमोल सुतार, दिनेश दळवी, भगवान कोंडभर, ओंकार शीर्के , किसन गायकवाड, सतीश मोरे, अंकुश गायकवाड, भरत मोरे, मा.ग्रा सदस्य भाऊ हुलावळे, एकवीरा विद्यालयातील शिक्षक विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान शिंदे सर , बाबाजी हुलावळे , सचीन हुलावळे , उमेश ईंगुळकर सर , संतोष हुलावळे सर , दिलीप पोटे सर, काकासाहेब भोरे सर, शिक्षिका अनुराधा हुलावळे, शिक्षिका नाजुका सोनकांबळे, कार्ला गावातील ग्रामस्थ व आदी मान्यवर उपस्थित होते.
मळवली पाटण या गावांमध्ये ही 75 वा स्वातंत्र्य दिन कोरोनाचे सर्व नियम पाळत उत्सहात साजरा करण्यात आला आहे.पाटण मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण शाळा समितीचे सदस्य गणेश बाळू तिकोणे तर ग्रुप ग्रामपंचायत पाटण कार्यालय येथील ध्वजारोहण सरपंच प्रवीण संभाजी तिकोणे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, गावातील ग्रामस्थांच्या उपस्थित ध्वजारोहनाचा कार्यक्रम संपन्न झाला.