Wednesday, January 15, 2025
Homeपुणेमावळकार्ला, मळवली - सदापूर ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका जाहीर....

कार्ला, मळवली – सदापूर ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका जाहीर….

कार्ला- मावळ (प्रतिनिधी )- कार्ला, मळवली – सदापूर ग्रामपंचयात सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका आज निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडल्या. कार्ला ग्रामपंचायतच्या सरपंचपदी दिपाली हुलावळे तर उपसरपंचपदी किरण हुलावळे यांची निवड झाली.


यावेळी निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी दिपाली हुलावळे व सोनाली मोरे तर उपसरपंचपदासाठी किरण हुलावळे व सनी हुलावळे यांनी अर्ज भरले व गुप्त मतदान पध्दतीने निवडणूक घेण्यात आली यामध्ये दिपाली हुलावळे व किरण हुलावळे यांना पाच तर सोनाली मोरे व सनी हुलावळे यांना चार मते मिळाली. यामध्ये दिपाली हुलावळे सरपंच व किरण हुलावळे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय आधिकारी बाळासाहेब दरवडे व सहाय्यक सुभाष धोत्रे यांनी जाहीर केले.या वेळी कार्ला गावचे पोलीस पाटील संजय जाधवही उपस्थित होते.

तसेच मळवली सदापूर ग्रुपग्रामपंचायत सरंपच व उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली.निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी आनिसा शेख व लक्ष्मी खराडे यांनी तर उपसरपंचपदासाठी हालीमा इनामदार व अनिल कांबळे यांनी अर्ज भरला होता.

वेळेत कोणीही माघार नघेतल्याने निर्णय अधिकारी डी. सी. कारकर यांच्या मार्गदशनाखाली हात उंच करुन मतदान घेतले यामध्ये अनिसा शेख व हालीमा इनामदार यांना पाच तर लक्ष्मी खराडे व अनिल कांबळे यांना चार मते पडली यामध्ये शेख व इनामदार यांना एक एक मत जास्त पडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निर्णय आधिकारी डि सी कारकर ग्रामसेवक नासीर पठाण यांनी शेख यांची सरपंचपदी तर इनामदार यांची उपसरपंचपदी निवड जाहीर केली.

- Advertisment -

You cannot copy content of this page