
कार्ला :कार्ला ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच स्वर्गीय संजय (अविनाश) गणपत हुलावळे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्या वत्सला संजय हुलावळे यांच्या वतीने कार्ला परिसरातील आदिवासी कुटुंबाना अन्नधान्य, अल्पोपहार, मिठाई वाटप करण्यात आली.यावेळी कार्ला ग्रामपंचायतीचे मा.सदस्य भाऊसाहेब हुलावळे,सरपंच दिपाली हुलावळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे,सदस्या सोनाली मोरे, उज्वला गायकवाड,भारती मोरे,सतिश मोरे,बंटी हुलावळे, किरण गायकवाड,गणेश हुलावळे,सचिन हुलावळे,प्रविण हुलावळे,शब्बीर मणियार,अक्षय हुलावळे,आदेश हुलावळे, आदित्य हुलावळे,अमोल इंगवले,अक्षय केदारी,आशिष हुलावळे, साहिल हुलावळे,रुतुराज हुलावळे,रिद्धी हुलावळे, स्वरांजली हुलावळे उपस्थित होते.
आवानानाविषयी सांगायचे म्हटले तर “आवानाना” एक आगळेवेगळे व्यक्तीमत्त्व, दिलखुलास माणुस सर्वांना हवेहवेसे वाटणारे, लोकांशी बोलणे त्यांच्या समस्या जाणुन घेणे.त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे, सर्वांशी प्रेमाने,आपुलकीने बोलणे लहानांबरोबर लहान होणे, मिञांबरोबर मिञांसारखे व स्ञियांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी सतत त्यांचे प्रयत्न होते.
गोर-गरीबांचे कैवारी होते,कुठलाही आदिवासी व्यक्ती व गावातील व्यक्तींना काही अडचणी असेल तर आवानाना त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवत नसे अशी त्यांची ख्याती होती.अशा प्रकारे त्यांच्या पश्चात अशीच अविरत सेवा करण्याचे त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्या वत्सला संजय हुलावळे व त्यांच्या कुटुंबियांकडुन सांगितले जात आहे.