Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळाकार्ला येथील 4 वर्षीय बालकाचा ठोंबरे वाडी येथे स्विमिंग पुलच्या पाण्यात बुडून...

कार्ला येथील 4 वर्षीय बालकाचा ठोंबरे वाडी येथे स्विमिंग पुलच्या पाण्यात बुडून मृत्यू….

लोणावळा दि.29: लोणावळा ठोंबरे वाडी येथे ऐका चार वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.


कु. श्लोक ज्ञानेश्वर हुलावळे (रा. कार्ला. मावळ ) ह्या चार वर्षीय बालकाचा स्विमिंग पूल मधील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. श्लोक हा त्याचे वडील ज्ञानेश्वर व आई ह्यांच्या सोबत लोणावळा ठोंबरे वाडी येथील ऐका बंगल्यावर माळी काम करत होते. आज सकाळी 11:30 ते 12:00 वा. च्या सुमारास त्याचे वडील ज्ञानेश्वर हे काही कामास्तव लोणावळा मार्केट मध्ये गेले होते.

आणि त्याची आई ही बंगल्यात काम करत होती. तेवढ्यात श्लोक हा खेळता खेळता बंगल्यामधील स्विमिंग पूलमधील पाण्यात पडला आणि त्यावेळी कोणाचेही लक्ष नसल्याने श्लोक ह्या चार वर्षीय बालकाला पाण्यात बुडून आपला जीव गमवावा लागला.

- Advertisment -

You cannot copy content of this page