Sunday, June 23, 2024
Homeपुणेमावळकार्ला येथे झालेल्या सर्वेक्षण अभियानाला, नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद..

कार्ला येथे झालेल्या सर्वेक्षण अभियानाला, नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी- गणेश कुंभार, मावळ प्रतिनिधी रोषनी ठाकुर, कार्ला दि. 23: मावळ तालुक्यात वाढती रूग्ण संख्या लक्षात घेवुन ” माझ कुटुंब ,माझी जबाबदारी, या मोहिमेअंतर्गत आज सर्वेक्षण होणार होते.या मध्ये कामशेत, कार्ला ,नवलाखउंब्रे, वराळे या गावांचा समावेश होता . उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के ,मावळ तहसिलदार मधुसूदन बर्गे यांच्या आदेशानुसार कार्ला गावातील प्रतेक कुटुंबातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्ला येथील नागरिकांनी या सर्वेक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद ठेवून एक दीवसाचा जणता कर्फ्यु पाळण्यात आला होता.या वेळी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे , आरोग्य आधिकारी चंद्रकांत लोहरे व मावळ आरोग्य विभागाने कार्ला गावात भेट देऊन नागरीकांची विचारपुस करुन सर्वेक्षणाचा आढावा घेतला.या सर्वेक्षणात एकुण 11 टीम तयार केल्या होत्या.प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची थर्मामीटरने तापमान व आॅक्सिमीटरने आॅक्सीजनची पातळी चेक केली. तर 55 जणांची एॅटी रॅपीड टेस्ट घेण्यात आली.
कार्ला गावातील एकुण 498 कुटूंबातील 2363 नागरीकांपैकी 2324 नागरीकांची तपासणी या सर्वेक्षणामधुन झाली अशी माहीती कार्ला झोनल प्रमुख रमेश गायकवाड यांनी दीली तर , 55 जणांची एॅटी रॅपीड टेस्ट घेण्यात आली होती या मध्ये ऐकाचा अहवाल हा पाॅझिटीव्ह आला असुन , 54 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आल्याची माहिती कार्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती पोळ यांनी दीली.
या सर्वेक्षणामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला येथील वैद्यकिय अधिकारी डाॅ. भारती पोळ, आरोग्य सेवक प्रसाद बीराजदार, शिवाजी चव्हाण,वैशाली ढोरे, आशा सेविका , आरोग्य सेविका, अंगनवाडी सेविका,एकविरा विद्या मंदिर कार्ला येथील शाळेतील मुख्याध्यापक लाखेसर , भोरे सर , दगडे सर, शिक्षीका,सोनकांबळे मॅडम, शिकक्षेक्तर प्रतिनिधी बाबाजी हुलावळे, तर सर्वेक्षणामध्ये उपजिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे, माजी उपसरपंच किरण हुलावळे, मा.ग्रा.सदस्य भाऊ हुलावळे, अंनंता हुलावळे,पोलिस पाटील संजय जाधव, झोनल अधिकारी रमेश गायकवाड , मा उपसरपंच अविनाश हुलावळे,सुनिल सावळे,सतिश मोरे, अमोल वायकर,रवी इंगळे ,बबलु येवले, संतोष हुलावळे, शिवाजी म्हाळसकर,अविनाश हुलावळे, समिर हुलावळे, कृष्णा जंगम, वैभव हुलावळे, गणेश हुलावळे, रुपाली नानेकर,आक्षय शिर्के, विशाल हुलावळे, केतन हुलावळे, कार्तिक जाधव, सागर जाधव, नंदु सोंडकर, सुरज हुलावळे, अशा एकुण 50 ते 60 तरुणांनी स्वयंसेवक म्हणून अतिशय मोलाच योगदान देवुन सामाजीक बांधिलकी जपत सर्वेक्षणामध्ये सहभागी झाले होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page