कार्ला येथे विविध्द विकासकामांचे भूमी पूजन व उदघाटन…

0
138

कार्ला- मावळ दि.14: कार्ला येथे विविद्ध विकासकामांचे भुमीपुजन व उदघाटन करण्यात आले आहे.पुणे जि.प.कृक्षी व संवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर , मावळ तालुका रा.क्राॅ. चे अध्यक्ष बबनराव भेगडे , संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, जि.प.सदस्या कुसुम काशिकर, पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत ,मावळ रा. काॅग्रेसचे कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, सरपंच दिपाली हुलावळे उपसरपंच किरण हुलावळे, मा.जि. प. सदस्य भरत मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्ला गावासाठी मावळ चे आमदार सुनिल शेळके व जि.परीषद सभापती यांच्या फंडातुन सुमारे 1 कोटी 16 लाख रुपयांच्या विकासकामांच्या भुमीपुजनाचा व उद्घाटनाचा कार्यक्रम कार्ला येथे पार पडला. कार्ला गावासाठी मावळ चे आमदार सुनिल शेळके,जि. प.सभापती बाबुराव वायकर, जि. प.सदस्या कुसुम काशिकर, पंचायत समिती सदस्य महादु उघडे यांच्या माध्यमातून महालक्ष्मी मंदिर संरक्षण भिंत, जि. प.शाळा दुरुस्ती अंगणवाडी इमारत, कार्ला प्रा.आ.केंद्रातील प्रसुतीगृह, नविन पशुवैद्यकीय दवाखाना, स्मशानभुमी रोड, नविन ग्रामपंचायत कार्यालय, इंद्रायणी नदीजवळ स्मशानभुमीला सौरक्षन भिंत.आशा विविद्ध कामांचे भुमीपुजन व उद्घाटन करण्यात आले.

या वेळी सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे,ग्रा.सदस्या उज्वला गायकवाड, ग्रा सदस्य सागर जाधव, ग्रा. सदस्या भारती मोरे .कार्ला गावचे पोलीस पाटील संजय जाधव, ग्रामसेवक सुभाष धोत्रे, अंकुश गायकवाड, माजी सरपंच निशा हुलावळे, बेबी हुलावळे, संभाजी भानुसघरे, नंदु हुलावळे,डाॅ. भारती पोळ,किसन आहेर, विवेक हुलावळे, सुरज हुलावळे, अभिनव जाधव, रुपाली नानेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.