Friday, June 14, 2024
Homeपुणेमावळकार्ला येथे शिवशंकर मंडळाच्यावतीने कोरोना योध्यांचा सन्मान....

कार्ला येथे शिवशंकर मंडळाच्यावतीने कोरोना योध्यांचा सन्मान….

कार्ला-मावळ ( प्रतिनिधी) दि.12 : कार्ला येथील श्री. शिवशंकर तरूण मंडळाच्या वतीने गेल्या वर्षभरातील कोरोना काळात नागरीकांना आधार देण्यासाठी मदतीचा हात पुढे करून आपल्या माणुसकीचे दर्शन घडविले अशा ग्रामपंचायत हद्दीतील सामाजिक संस्थाना व व्यक्तींना “कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच तरूण हा समाजाच्या पाठीचा कणा आहे. समाजात चांगले तरूण घडावे व अशा तरूणांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या वर्षा पासून मंडळाच्या वतीने, मंडळाचे सदस्य कै. गणेश विश्वनाथ हुलावळे यांच्या स्मरणार्थ “आदर्श तरूण” पुरस्कार देण्यात आला. यावर्षी हा पुरस्कार कार्ला गावातील तरूण आदर्श व्यक्तिमत्व ॲड. सुनिल पंढरीनाथ पटेकर यांना देण्यात आला.


यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे, माजी सरपंच सागर हुलावळे, माजी उपसरपंच प्रदिप हुलावळे, अविनाश हुलावळे,अजयमामा शिराली, ग्रामपंचयात सदस्य सचिन हुलावळे,सनी हुलावळे,सदस्या सोनाली मोरे,पोलिस पाटील संजय जाधव,शिवशंकर तरुण मंडळाचे संस्थापक भाऊसाहेब हुलावळे,देवघरचे पो पाटील अनता शिंदे, सावित्रीबाई फुले पुणे विधापीठ कक्षाचे(पुणे,नगर,नाशिक) युवासेनेचे उपाध्यक्ष विशाल हुलावळे, मंडळाचे अध्यक्ष कैलास हुलावळे,माजी अध्यक्ष दिलीप हुलावळे,उपाध्यक्ष रोहिदास शिर्के,जेष्ठ नागरिक सदाशिव हुलावळे,हभप सिताराम हुलावळे,संतोष हुलावळे,रमेश जाधव,किरण गायकवाड, यांच्यासह सर्व कार्ला ग्रामस्थ उपस्थित होते.तत्पूर्वी सकाळी भाऊसाहेब हुलावळे यांच्या हस्ते रूद्र अभिषेक करण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सोशल डिस्टिसिंग, मास्क वापरण्याच्या सुचना देत मंडळाच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच रात्री दहीवली येथील भजनी मंडळाच्या वतीने हरीजागर करण्यात आला.


कार्यक्रमाचे संयोजन,मंडळाचे सल्लागार,माजी ग्रामपंचयात सदस्य भाऊसाहेब हुलावळे, मा. अध्यक्ष दिलीप हुलावळे ,अध्यक्ष कैलास हुलावळे,उपाध्यक्ष रोहिदास शिर्के,मितेश हुलावळे,संभाजी बबन हुलावळे, कुमार हुलावळे,विशाल हुलावळे,गणेश हनुमंत हुलावळे,विशाल वसंत हुलावळे,निलेश शिर्के,राजु गणपत हुलावळे,मा. उपाध्यक्ष संजय दत्तु हुलावळे,सचिन भीम हुलावळे,विनोद बाळु हुलावळे,अनिल चंद्रकांत हुलावळे,अशिष हुलावळे,आकाश हुलावळे,साहिल हुलावळे,माऊली हुलावळे, यांच्यासह मंडळाचे अन्य सदस्य यांनी केले होते.


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाऊसाहेब हुलावळे तर आभार कुमार हुलावळे यांनी मानले.उपस्थित मान्यवरांना मंडळाच्या वतीने मास्क चे वाटप करण्यात आले.

- Advertisment -

You cannot copy content of this page