कार्ला श्रीमंती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेजचा निकाल १०० टक्के..

0
267

कार्ला- मावळ ( प्रतिनिधी गणेश कुंभार)कार्ला- नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमंती   लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेज कार्ला यांचा  मार्च २०२० बारावी  वार्णिज्य शाखेचा  निकाल १००% टक्के  लागला आहे.

यामध्ये कु साक्षी बाबुराव नरवडे ७३.८४ टक्के मार्क घेत प्रथम आली तर ,द्वितीय क्र. अभय सुभाष चव्हाण   ७३.३० टक्के  तर कु  प्रतिमा सुभाष कुंभार  ७० टक्के  मार्क मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.

या सर्व विद्यार्थांंना मार्गदशन प्रा काजल गायकवाड, प्रा  सचिन हुलावळे,प्रा जयश्री  गरुड व सर्व प्राध्यापक व शिक्षक यांचे लाभले.
विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक ह्यांचे मिळालेल्या यशाबद्दल नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे,सचिव संतोषजी खांडगे,शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे,मुख्याध्यापक शहाजी लाखे,जेष्ठ शिक्षक संतोष हुलावळे,कार्ला गावचे सरपंच रूपाली हुलावळे, उपसरपंच अविनाश हुलावळे, मा उपसरपंच प्रदीप हुलावळे,सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन केले.

तसेच आज कार्ला गावातील इयत्ता १२ वी च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे युवा सेनेच्या वतीने अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे,युवा सेना शाखा अधिकारी आदित्य हुलावळे,उपशाखा अधिकारी दिनेश हुलावळे,भाविसे शाखा संघटक आदेश हुलावळे,उपशाखा संघटक अमोल इंगवले,उपशाखा संघटक अक्षय केदारी,उपशाखा संघटक आशिष हुलावळे,आकाश केदारी उपस्थित होते.