if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मावळ (प्रतिनिधी):मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस चालू आहे पाऊस जास्त चालू असल्या मुळे लोक मोठया प्रमाणात चार चाकी, दुचाकी घेऊन येत आहेत यामुळे जागो जागी वाहतूक कोंडी होत आहे. अनेक ठिकाणी पर्यटनास बंदी असून ही पर्यटक स्वतःचा जीव धोकयात घालून सुरक्षा व्यवस्थाची,पोलीसांची नजर चुकवून त्या ठिकाणी जात असतात,अशामुळे काही पर्यटकानी आपला जीव ही गमवला आहे, पोलीस भर पावसात भिजून त्यांचे काम प्रामाणिक पणे करत आहेत. परंतु पाटबंधारे खाते एवढे निष्क्रिय आहे की धरणात पाणी साठा वाढलाकी नदी काठच्या गावांना हाय अलर्टचा इशारा देतात पण वर्ष भरात नदी काठचे कोणतंही अतिक्रमन काढत नाहीत, किंवा धोकादायक नदीपात्राच्या ठिकाणी कायम स्वरूपी सुरक्षा कठाडे देखील बांधत नाही, या पाटबंधारे खात्याच्या निष्क्रियतेमुळे अनेक जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत.अशा ठिकाणी काही घटना घडलीकी लोक पोलीसांकडे जातात आणि आपला रोष व्यक्त करतात पण ह्या सगळ्याला पाटबंधारे खाते जबाबदार आहे,खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी पर्यटनास बंदी आहे अशा ठिकाणी पोलीसांची नजर चुकवून जे पर्यटक जात आहे अशा पर्यटकांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे.
अशा आपत्तीजनक परिस्थितीत काम करणारे महाराष्ट्र पोलीस,NDRF टीम,शिवदुर्ग मित्र लोणावळा, ईतर सामाजीक संस्था व वन्यजीव रक्षक मावळ संस्था सर्च आणि रेस्कू टीम यांच्या कामाला खरोखरच सॅल्यूट आहे.काही मदत लागली तर 1077 जिल्हा आपत्ती, 112 पोलीस, तसेच 9822555004 वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्याशी संपर्क करावा.घरी रहा, काळजी घ्या,सतर्क रहा, सुरक्षित रहा असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.