Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" काळभैरव माध्यमिक विद्यालय किरवली " शाळेस प्रथम क्रमांकाचे ३ लाख रु....

” काळभैरव माध्यमिक विद्यालय किरवली ” शाळेस प्रथम क्रमांकाचे ३ लाख रु. चे बक्षिस धनादेश वाटप !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी राबविलेल्या ” स्वच्छ सुंदर शाळा ” स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम आज दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी पंचायत समिती कर्जत येथे पार पडला . या उपक्रमास कर्जत तालुक्यातील ” काळभैरव माध्यमिक विद्यालय किरवली ” या शाळेस उपक्रमातील २९ बाबी ” अप्रतिम व साजेसे ” दर्शवून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले होते . या प्रथम क्रमांक ३ लाख रुपयांचे बक्षिसांचे धनादेश वितरण गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे व गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला . यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी मान. साबळे साहेब होते तर प्रमुख मार्गदर्शक संतोष दौंड साहेब होते.

खाजगी शाळा मधून प्रथम क्रमांक- काळभैरव माध्यमिक विद्यालय किरवली (३ लाख रु . ) , द्वितीय क्रमांक महिला मंडळ शाळा कर्जत ( २ लाख रु. ) , तृतीय क्रमांक स्वामी विवेकानंद पोशिर ( १ लाख रु. ) तर जिल्हा परिषद शाळेतून प्रथम क्रमांक – प्राथमिक शाळा किरवली (३ लाख रु. ) , द्वितीय क्रमांक – आदिवासी शाळा पाली ( २ लाख रु. ) , तृतीय क्रमांक- प्राथमिक शाळा कोल्हारे ( १ लाख रु. ) आदी बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमास पंचायत समितीचे अधिकारी वर्ग तसेच विजेत्या शाळेतील सर्व मुख्याध्यापक – शिक्षक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . मुख्याध्यापक राजेंद्र बोराडे सर् यांनी या प्रथम क्रमांक पटकावले याचे श्रेय संतोष दौंड साहेब यांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे झाले , तर विद्यार्थ्यांनी देखील आपले ” कसब व कला ” दाखवून या उपक्रमातील २९ बाबी ठसठशीत दाखविल्यामुळे व मी मुख्याध्यापक म्हणून कागदोपत्री या उपक्रमाचे ” प्रात्यक्षिक रेखाटल्यामुळे ” या पारितोषिक मिळवण्यात सर्वांचाच पुढाकार असल्याचे सांगितले . गटशिक्षणाधिकारी साहेब संतोष दौंड , गटविकास अधिकारी साबळे साहेब यांनी देखील मोलाचं मार्गदर्शन केले व पुढील वर्षी अधिक जोमाने कार्य करून जिल्हा परिषद ते राज्यापर्यंत कार्य करण्यासाठी व विजेते पद मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या . कर्जत तालुक्यातून हेदवली शाळेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला व ३५ लाख रुपये पटकाविले . यावेळी या शाळेचे देखील अभिनंदन करण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page