Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकाशिनाथ शंकर केरेकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार..

काशिनाथ शंकर केरेकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार..

माथेरान – दत्ता शिंदे

माथेरान मधील गोडाऊन किपर तसेच अधीक्षक कार्यालयातील शिपाई पदावर कार्यरत असलेले काशिनाथ शंकर केरेकर हे मागील ३७ वर्षांपासून अत्यंत इमानेइतबारे आपले कर्तव्य पार पाडत होते.
दि.३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा छोटेखानी सत्कार समारंभ नुकताच प्रसादभाई जनसंपर्क कार्यालयात करण्यात आला यावेळी नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत, माजी नगरसेवक अवधूत येरफुले,विवेक केरेकर, अमोल सोनवणे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

काशीनाथ केरेकर यांचा सर्वांशी आपुलकीने आणि प्रेमळ स्वभाव असल्याने अधीक्षक कार्यालयात कुणीही सर्वसामान्य नागरिक अथवा अशिक्षित व्यक्ती काही कामानिमित्त आल्यास त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांच्या कार्यकाळात केल्यामुळे त्यांचा इथल्या नागरिकांना शासकीय कामासाठी एक आधार होता.
कामानिमित्त येणाऱ्या लोकांची त्यांनी या अनेकदा कामे केली आहेत.आपल्या ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यावरइथल्या अशिक्षित आणि सर्वसामान्य लोकांची कामे कोण करणार यामुळे त्यांनाही एकप्रकारे उणीव भासत असल्याचे केरेकर यांनी सांगितले.यावेळी प्रसाद सावंत यांसह उपस्थितांनी त्याना पुढील निरोगी दिर्घआयुष्य साठी शुभेच्छा दिल्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page