Wednesday, May 29, 2024
Homeपुणेतळेगावकिशोर आवारे खून प्रकरणातील पाच आरोपी जेरबंद…

किशोर आवारे खून प्रकरणातील पाच आरोपी जेरबंद…

मावळ (प्रतिनिधी): जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणातील आता पाचव्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी एकाला पुणे पोलिसांनी तर तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली. तर पाचव्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट पाचने देहूरोड येथून ताब्यात घेतले.
रघु धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर यांना खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली. संदीप मोरे पुणे पोलिसांनी अटक केली. सिनु उर्फ श्रीनिवास व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहूरोड) याला गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली आहे.
याप्रकरणी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर (रा. तळेगाव दाभाडे) आणि श्याम याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किशोर आवारे यांच्या आई, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
क्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास किशोर आवारे नगरपरिषद कार्यालयात गेले असता तिथे श्याम निगडकर आणि त्याच्या तीन साथीदारांनी बंदुकीतून गोळ्या झाडून व कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून त्यांना ठार मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेले. आरोपींच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी विविध पथके रवाना केली. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट दोन यांच्या पथकांनी रात्रभर मावळ परिसर धुंडाळून काढला.
पहाटेच्या वेळी नवलाख उंबरे येथून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन मारेकरी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या एकाला अटक केली. तर पुणे पोलिसांनी नाना उर्फ संदीप मोरे याला अटक केली.
आरोपी सिनू हा देहूरोड परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट पाचला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.
चार आरोपींना शनिवारी दुपारी वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडे चौकशीदरम्यान खुनाचे नेमके कारण आणि इतर बाबी समोर येतील. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page