Tuesday, February 27, 2024
Homeक्राईमकिशोर आवारे यांच्या हत्येमागील मोठा खुलासा, बदला घेण्याच्या उद्देशातून हत्या झाल्याचे तपासात...

किशोर आवारे यांच्या हत्येमागील मोठा खुलासा, बदला घेण्याच्या उद्देशातून हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न…

मावळ (प्रतिनिधी): जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या मावळ हादरवीणाऱ्या हत्या प्रकरणात सातत्याने नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. शनिवारपर्यंत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याला पोलिसांनी अटक केली आहे.
गौरव खळदे याच्या अटकेनंतर किशोर आवारे हत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याने ही हत्या घडवून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
अटक आरोपींनीही हत्येमागचे कारण सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर गौरव खळदेला तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
काही महिन्यांपूर्वी जुन्या तळेगाव नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. वडीलांच्या कानाखाली मारली याचाच राग मनात धरून भानू खळदे यांचा मुलगा गौरव याने बदला घेण्याचे ठरवले आणि त्यानुसार नगरपरिषद कार्यालयात किशोर आवारे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page