Tuesday, April 16, 2024
Homeपुणेवडगावकुठलेही काम ओझे समजून करू नका तर आनंद म्हणून करा मानसिक त्रास...

कुठलेही काम ओझे समजून करू नका तर आनंद म्हणून करा मानसिक त्रास कमी होईल, सत्यसाई कार्तिक…

मावळ (प्रतिनिधी):वडगाव नगरपंचायत हद्दीतील माळीनगर येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल च्या वतीने वडगाव मावळ व कामशेत पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांच्या कुटुंबियांसाठी शुक्रवार दि. 13 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उदघाटन लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी IPS सत्यसाई कार्तिक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सत्यसाई कार्तिक म्हणाले कि 24 तास कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. कुठलेही काम हे ओझे समजून करू नका तर आनंद म्हणून काम करा म्हणजे मानसिक थकवा जाणवत नाही. नियमित व्यायाम तसेच नियमित आरोग्य तपासणी काळाची गरज आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.

सदर शिबिरात नाडी, रक्तदाब, रक्तातील साखर, रक्ताचे प्रमाण, किडनी तपासणी, चरबीचे प्रमाण, छातीचा एक्स रे, इसीजी, एमआय, नेत्र चिकित्सा आदी तपासणी मोफत करण्यात आली.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक विलास भोसले, संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक विजयवडोदे, डॉ. विकास जाधवर, डॉ. राहुल पाटील, डॉ. प्रकाश बिक्कड, डॉ. स्मिता जाधवर, डॉ. सारिका सोळंकी, पोलीस अंमलदार संजय सुपे, कैलास कदम, सचिन कदम, गणेश तावरे, सुनील साळुंके, सुहास सातपुते, सागर बनसोडे, अब्दुल शेख, अंकुश नाईकुडे, संपत वायळ, गणपत होले, अंकुश मिसाळ बहुसंख्येने पोलीस बांधव व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. विकास जाधवर म्हणाले पोलिसांमुळेच आपण आनंदाने सणोत्सव साजरे करतो. सुखाने जीवन जगत असतो सामाजिक बांधिलकीतुन पोलिसांप्रति आपली जबाबदारी म्हणून या शिबिराचे आयोजन केले. यापुढेही अश्या शिबिराचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी केले तर आभार डॉ. सारिका सोळंकी यांनी मानले.

- Advertisment -

You cannot copy content of this page