Wednesday, May 29, 2024
Homeपुणेमावळकुलस्वामिनी महिला मंच आयोजित खेळ मांडीयलाच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या मनीषा वाणी…

कुलस्वामिनी महिला मंच आयोजित खेळ मांडीयलाच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या मनीषा वाणी…

मावळ (प्रतिनिधी): मावळ कुलस्वामीनी महिला मंच यांच्या वतीने महिला दिनानिमित्ताने आयोजित खेळ मांडियेला हा कार्यक्रम शनिवार दि.18 मार्च रोजी तळेगाव दाभाडे शहरात मोठ्या थाटामाटात पार पडला.
या कार्यक्रमात मनीषा भुषण वाणी या “सौभाग्यवती मावळ 2023″च्या विजेत्या ठरल्या. त्यांना प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी, दुचाकी मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आली.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे हा कार्यक्रम प्रभावशील करण्यासाठी खास निवेदक म्हणून होम मिनिस्टर फेम प्रसिद्ध कलाकार आदेश बांदेकर हे उपस्थित होते.
आमदार सुनिल शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके यांच्या कुलस्वामिनी महिला मंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळेगाव दाभाडे शहर यांच्या माध्यमातून या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फक्त तळेगाव दाभाडे शहरच नाही तर मावळ तालुक्यातून मोठ्या संख्येने महिला भगिनी कार्यक्रमाला उपस्थित झाल्या होत्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page