Thursday, May 30, 2024
Homeपुणेलोणावळाकुसगांव भैरवनाथ नगर येथे एकत्रित रमजान ईद साजरी करत,शीरखुर्मा (खीर)चे वाटप…

कुसगांव भैरवनाथ नगर येथे एकत्रित रमजान ईद साजरी करत,शीरखुर्मा (खीर)चे वाटप…

लोणावळा (प्रतिनिधी): रमजान ईद निमित्त कुसगांव भैरवनाथ नगर येथे मुस्लिम बांधवांकडून शीरखुर्मा (खीर ) वाटप करून ईद उत्सहात साजरी करण्यात आली. तसेच मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मंडळींना श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
रमजान महिना या पवित्र महिन्याच्या अखेरीस रमजान ईद हा सन सर्व मुस्लिम बांधव पूर्ण भक्तिभावाने साजरा करतात.या निमित्ताने मुस्लिम बांधवांकडून कुसगांव भैरवनाथ नगर येथे शीरखुर्मा (खिरीचे ) वाटप आज करण्यात आले.
मुस्लिम बांधवांच्या आनंदोस्तवात सहभागी होऊन एस आर पी पुणे जिल्हा युवक अध्यक्ष नितीन साळवे, मावळ तालुका खरेदी विक्री संघ व्हाईस चेअरमन संतोष राऊत, मा. पंचायत समिती सदस्य हरिष कोकरे, कुसगांव ग्रामपंचायत मा. उपसरपंच प्रवीण साळवे, ग्रामपंचायत सदस्य नितीन मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहर युवक अध्यक्ष विनोद होगले, एस आर पी नाणे मावळ युवक उपाध्यक्ष नागेश गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते संतोष मामा बेंगळे, उमेश मोरे व मंगेश चौधरी आदींनी एकता व मानवतेचे दर्शन घडविले.यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने श्रीफळ देऊन उपस्थितांचा सत्कार करण्यात करण्यात आला.
- Advertisment -

You cannot copy content of this page