Wednesday, September 27, 2023
Homeपुणेमावळकुसुमताई काशीकर यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम...

कुसुमताई काशीकर यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम…

( मावळ प्रतिनिधी )
वेहेरगाव : जिल्हा परिषद सदस्या कुसुम काशीकर यांच्याकडून मावळातील वेहेरगाव-दहिवली ग्रामपंचायतीला वैद्यकीय साहित्यांची मदत. जिल्हा परिषद सदस्या कुसुम ज्ञानेश्वर काशीकर यांच्या जि. प. निधीतून वेहेरगाव-दहिवली ग्रामपंचायतीला नागरिकांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय साहित्याची मदत देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना ग्रामपंचायतच्या वतीने राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्हा परिषद सदस्या कुसुम ज्ञानेश्वर काशीकर यांच्या जि. प. निधीतून वेहेरगाव-दहिवली ग्रामपंचायतीला २ औषध फवारणी कँड्स, २ सॅनिटायझर कँड्स, हँडवॉश, २ पीपीई.किट,१आॅक्सीमिटर सुपूर्द करण्यात आले.

यावेळी उपसरपंच तानाजी पडवळ, संतोष गायकवाड व ग्रुप ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.तसेच पंचायत समिती सदस्य महादु उघडे यांच्याकडून टाकवे (खु) येथील कोविड केअर सेंटरला २० वाफ घेण्याच्या यंत्रांची मदत करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड, भाऊसाहेब माने उपस्थित होते.

- Advertisment -