Sunday, September 24, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडकेंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा यांच्याबरोबर कोळी महासंघाची प्रदीर्घ चर्चा..

केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा यांच्याबरोबर कोळी महासंघाची प्रदीर्घ चर्चा..

खोपोली( दत्तात्रय शेडगे )
महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीला जातीचे दाखले मिळविण्यासाठी येणार्‍या अडचणी आणि दाखला तपासणी संदर्भामध्ये होणाऱ्या अन्याया विरोधात केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा यांच्या सोबत कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाने प्रदीर्घ चर्चा केली.


नवी दिल्ली येथील त्यांच्या दालनामध्ये झालेल्या चर्चेत कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सदस्य रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाल कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके, युवा अध्यक्ष अँड चेतनभाई पाटील, नेते देवानंद भोईर आणि तज्ञ मंडळी उपस्थित होती.

- Advertisment -