Sunday, September 24, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडकेंद्र सरकार विरोधात खोपोली मध्ये कॉग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन...

केंद्र सरकार विरोधात खोपोली मध्ये कॉग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन…

केंद्र सरकार विरोधात खोपोली मध्ये कॉग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन.शेतकरी ,शेतमजूर व कामगार बचाव दिवस पाळला….

खोपोली- दत्तात्रय शेडगे

केंद्र सरकारने शेतकरी, शेतमजूर व कामगार काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी खोपोली काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले, हे आंदोलन आज डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर हे आंदोलन करून केंद्र सरकार विरोधात निषेध नोंदवत 2 आक्टोबर हा दिवस शेतकरी ,शेतमजूर व कामगार बचाव दिवस पाळण्यात आला,तर काल उत्तर प्रदेश सरकारने राहुल गांधी यांना धक्काबुक्की केली त्याचाही निषेध करत उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करा अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी खोपोली शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रिचर्ड जॉन, युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश धावारे, महिला काँग्रेस अध्यक्षा रेखा जाधव, उपाध्यक्ष पी व्ही धावारे, पर्यावरण सेल अध्यक्ष जीलानी शेख, जिल्हा सदस्य सुनीती पाटील , माजी उपाध्यक्ष निवृत्ती मोरे, कमलाकर शेडगे, आदींसह अनेक कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisment -