Saturday, April 1, 2023
Homeपुणेलोणावळाकेवरे गेटच्या हद्दीत अज्ञात रेल्वे गाडीतून पडून 35 वर्षीय इसम जखमी...

केवरे गेटच्या हद्दीत अज्ञात रेल्वे गाडीतून पडून 35 वर्षीय इसम जखमी…

लोणावळा दि. 29 : रोजी रेल्वे कि.मी.नं 131/06/08 जवळ पुण्याच्या दिशेला केवरे गावच्या रेल्वे गेट च्या पुढे एक 35 वर्षीय अनोळखी इसम जखमी अवस्थेत मिळून आला. मंगळवारी दुपारी 02:40 वा. लोणावळा रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली की अज्ञात धावत्या रेल्वे गाडीमधून पडून एक जखमी झाला आहे.

सदर चा इसम उजव्या पायाने अपंग असून अंगाने सडपातळ, उंची 5फूट 4 इंच अशी आहे. रंगाने काळा सावळा असून अंगात आकाशी रंगाचा फुल शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट असा पेहनावा आहे. उजवा पाय गुडघ्या पासून अगोदरच तुटलेला आहे.

सदर इसमाच्या ओळखिचा कोणताही पुरावा त्याच्या जवळ सापडलेला नाही त्यामुळे सदर इसम कुठला आहे, त्याचे नाव व त्याच्या बद्दलची कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. जखमी अवस्थेत सापडलेल्या अनोळखी इसमास उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास पोलीस नाईक जाधव करत आहेत.

You cannot copy content of this page