Tuesday, September 26, 2023
Homeपुणेलोणावळाकेवरे रेल्वे गेट जवळ अज्ञात रेल्वेच्या धडकेने नागनाथ दत्तू काळे याचा मृत्यू...

केवरे रेल्वे गेट जवळ अज्ञात रेल्वेच्या धडकेने नागनाथ दत्तू काळे याचा मृत्यू…

लोणावळा दि.19 : केवरे वसाहत येथील लोहमार्ग कि. मी.130/26 जवळ सकाळी 9: 30 च्या सुमारास आढळला एका 55 वर्षीय इसमाचा मृतदेह.


लोणावळा ते मळवली दरम्यान लोहमार्गावर केवरे रेल्वे गेटच्या पुढे रेल्वे कि. मी.130/26 जवळ मयत नागनाथ दत्तू काळे ( वय वर्ष 55, रा. केवरे वसाहत, औंढे रोड, लोणावळा ) याचा मृतदेह सकाळी 9:30 वा. च्या सुमारास मिळून आला आहे. मयत नागनाथ याचा कोणत्यातरी अज्ञात रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला असल्याची माहिती लोणावळा रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जाधव यांनी दिली आहे. सदर परिसरात रेल्वे मार्गावर वारंवार असे “रण ओव्हर “चे प्रकार घडत आहेत.

अनेक वेळा बेवारस मृतदेह मिळून येत आहेत तर काही वेळा वारस असलेले मृतदेह मिळून येत आहेत. सध्या रेल्वे गाड्या बऱ्यापैकी सुरु झाल्या नसल्या तरी हे अपघाताचे सत्र सुरूच आहे.त्यातच आज आढळून आलेला मृतदेह हा तेथील स्थानिकाचा असल्याचे कळताच परिसरात खळबळ उडाली आहे.सदर बाबत लोणावळा रेल्वे पोलीस स्टेशन ला अपघाती मृत्यू दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार जाधव करत आहेत.

- Advertisment -