Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळाकै. उमेशभाई शेट्टी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष रोपण व कोरोना विरोधी लढ्यातील पोलीस...

कै. उमेशभाई शेट्टी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष रोपण व कोरोना विरोधी लढ्यातील पोलीस निरीक्षकांना सन्मान चिन्ह प्रदान…

लोणावळा-शिवसेना मावळ तालुका संस्थापक अध्यक्ष कै.उमेशभाई शेट्टी व शिवसैनिक कै.शंकरजी मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक १७ जुलै रोजी खंडाळा येथील कै.उमेशभाई शेट्टी स्मृथीस्थळावर विधीवत पूजन करण्यात आले तसेच खंडाळा येथे वृक्ष रोपण करण्यात आले.त्यावेळी लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांना कै.उमेशभाई शेट्टी प्रतिष्ठान मार्फत कोरोना संसर्गाच्या काळात विशेष कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी पुणे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्रजी खराडे साहेब कै. उमेशभाई शेट्टी यांचे चिरंजीव राहुल शेट्टी, मा.नगरसेवक सौम्याताई शेट्टी परिवारा बरोबर मावळतालुका उपप्रमुख सुरेशजी गायकवाड, मा. उपशहरप्रमुख मारुती खोले, मा. विभागप्रमुख ज्ञानदेव जांभुळकर, संजयजी घोंगे, सुरेशजी टाकवे, दिपक हुंडारे,शंकर जाधव,नगरसेवक बांधकाम सभापती सुनिल इंगुळकर, माजी नगरसेवक भालचंद्रजी खराडे, गणेशजी ईरले,सौ कांताताई मोरे, मनसे अध्यक्ष भारत चिकणे, अमित भोसले, निखिल भोसले, रितेश भोमे, हिंदु समिती सदस्य आनंदजी गावडे सर, सुनिल गायकवाड, चंद्रकांत गाडे, पो. पाटिल सदाभाऊ सोनार, पं. स. सदस्य संतोष राऊत, शिवसेनेचे मा. उपसरपंच शामबाबु वाल्मिकी,विशाल पाठारे, नरेश घोलप, सुनिल इंगुळकर, आकाश पोकळे, रानु सिंग, इंद्रजित तिवारी, सतीश गोणते, अविनाश शिंदे, सदानंद पिलाने, विनोद पिलाने, दिनेश विर,चंद्रकांत मराठे, सर्जेराव ढगे, बाजीराव ढगे,प्रमोद लोहीरे, दिलीप गायकवाड, मोहन राव, रमेश अकोला, उल्हास भांगरे, गणेश भांगरे, मारुती जाधव, बाप्पु कुलकर्णी, गिरीश म्हस्के, गिरीश ओसवाल,भीमा शिंगाडे, सचिन वाळके,ओमकार घोलप,सनी शेट्टी ,विजय चौरे,भावेश खराडे शिक्षण मंडळ माजी सभापती जितेंद्र वळसे, लक्ष्मण दाभाडे,जितेंद्र राऊत आदि पदाधिकारी उपस्थित होते.सदर कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यात आले.

- Advertisment -

You cannot copy content of this page