Friday, October 18, 2024
Homeपुणेतळेगावकै.कु.शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय...

कै.कु.शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी यांच्या वतीने दहावीत प्रथम आलेल्या कु.भक्ती कुटे हिचा गौरव…

मावळ (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद,मावळ “कै. अॅड्. कु.शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट, तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब ऑफ तळेगांव एम.आय.डी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने एस.एस. सी. बोर्ड.परीक्षेत प्रथम आलेल्या कु.भक्ती संभाजी कुटे हिला सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कु.भक्ती कुटे ही गोल्डन ग्लेडस करंजगाव या शाळेतील विद्यार्थिनी असून,शाळेत एस.एस.सी.बोर्ड परीक्षा मार्च 2023 मध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तिला सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे,महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मावळ अध्यक्ष लक्ष्मण मखर,कै.अँड.कु.शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष अजिंक्य खांडगे,रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. अध्यक्ष राहूल खळदे आदींसह पालक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page