Monday, July 22, 2024
Homeपुणेलोणावळाकै. डॉ. गोवर्धन व्यं. शिंगरे (बाबा ) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन..

कै. डॉ. गोवर्धन व्यं. शिंगरे (बाबा ) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन..

लोणावळा : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सभेच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष कै.डॉ.गोवर्धन शिंगरे उर्फ ‘ बाबा ‘ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दि.29 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रसंगी नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्य उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापिका सुनिता ढिले, उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक विजय रसाळ, श्रीनिवास गजेंद्रगडकर, क्षमा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी अनिल खामकर, मुख्य लिपिक कुंडलिक आंबेकर आणि शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमा पूजन केले.
पर्यवेक्षक गजेंद्रगडकर यांनी बाबांनी सभेसाठी घेतलेले कष्ट व त्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभारलेले नवनवीन शैक्षणिक संकुल याचा पाढा विद्यार्थ्यांसमोर वाचून दाखवला. बाबांनी विद्यार्थ्यांना प्रती पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती विद्यार्थ्यांनी करावी असे आवाहन केले.
शाळा समिती अध्यक्ष भगवानभाऊ यांना बाबांचा जास्तीत जास्त सहवास लाभलेला होता. त्यामुळेच बाबांबद्दल बोलताना भाऊंच्या डोळ्याच्या कडा नेहमीच अश्रूने ओल्या होतात. आपल्या बोलण्यामधून भाऊ बाबांबद्दल गौरव उद्गार काढताना सांगतात की, बाबा एक चालते बोलते विद्यापीठ होते, प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होणारे हक्काचे व्यासपीठ होते आणि प्रत्येक अडचणीच्या निवारणाचे ठिकाण होते.’ बाबा ‘ सर्व कर्मचाऱ्यांसाठी सावली सारखे होते.
सभेतील कोणताही कर्मचारी आपली अडचण घेऊन बाबांना सहज भेटायला जाऊ शकत होता. बाबा देखील त्यांची अडचण शांतपणे ऐकून घेत आणि अडचण सोडवण्याचा प्रयत्न करत. ‘बाबा’ सभेचे अध्यक्ष म्हणून कधीही वावरले नाही ते सर्व कर्मचाऱ्यांमध्ये मिळून मिसळून राहत. ‘ बाबा ‘ नेहमी सभेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत. अशा पितृतुल्य व्यक्तिमत्वाला आज सर्वांनीच आदरांजली अर्पण केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page