if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): कै. संकेत चंद्रकांत मडके यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त समस्त मडके परिवार (वाकसई, मावळ ) यांच्या वतीने अन्नदान.
वाकसई येथील मडके परिवार मावळ तालुक्यात नावाजलेला परिवार असून. चंद्रकांत मडके यांचे सुपुत्र कै. संकेत मडके यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ समस्त मडके परिवाराच्या वतीने संपर्क बालग्राम भाजे येथे एक वेळचे जेवण देण्यात आले.यावेळी बालग्राम येथील सर्व लहानांनी आनंद व्यक्त करत जेवणाचा अस्वाद घेतला. तसेच संपर्क बालग्राम संस्थेच्या वतीने मडके परिवाराचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी श्री दतु मडके, बबन येवले, कान्हु मडके, सुधाकर येवले, राघु येवले, ऊल्हास येवले, भाऊ आप्पा येवले,सुधाकर येवले,गणेश येवले,बबन सोपान येवले,अमोल मडके, निलेश येवले,दत्ताशेठ कोंडभर आदिजण उपस्थित होते.