कोकणातील धनगर समाजाचे नेते राजू बोडेकर यांचे निधन बोडेकर यांचे समाजासाठी मोठे योगदान..

0
245


सामाजिक चळवळीत नेहमी अग्रेसर असणारे आणि कोकणाततील धनगर समाजाचे एक खंबीर नेतृत्व ,समाजाचे आधारस्तंभ राजू बोडेकर यांचे काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले,यशवंत सेना यांच्या माध्यमातून कोकणात धनगर समाजसाची वज्रमूठ बांधून धनगर समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार या विषयावर आवाज उठवून समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी आजपर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.


समाजाच्या सुखदुःखात अडीअडचणी ते नेहमी अग्रेसर असत कोकणासह मुबंईवासीय बांधवांचा तारणहार म्हणून त्यांना ओळखले जायचे ,मात्र काल रात्री त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने कोकणातील धनगर समाजाचा आधारवड हरपला असून धनगर समाजातील सर्वसामान्यचा आधार हरपला असल्याची खंत समाज बांधवांतून व्यक्त होत आहे.