Thursday, September 28, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडकोकणातील धनगर समाजाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध- आमदार गोपीचंद पडळकर..

कोकणातील धनगर समाजाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध- आमदार गोपीचंद पडळकर..


कोतवाल धनगरवाडी या रस्त्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पार पडले भूमिपूजन..

खोपोली- दत्तात्रय शेडगे.

भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि बहुजनांचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोतवाल धनगर वाडी या गावाला भेट देऊन समाज बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या
कोकणातील पोलादपूर तालुक्यात अतिशय दुर्गम भागात कोतवाल धनगर वाडी हे गाव असून या गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे, या गावाला विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट देऊन कोतवाल धनगर वाडी ह्या रस्त्याचे भूमिपूजन करून तेथील पुलाचे उदघाटन केले.


कोतवाल धनगर वाडी कडे जाणारा हा तीन किमी चा रस्ता असून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या फंडातून या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले कोकणातील धनगर समाजाच्या विकासाठी सदैव कटिबद्ध राहून आगामी काळात धनगर समाजाच्या अडीअडचणी आणि समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार गोपीचंद पडळकर यांनी समाजबांधवाना दिली.


यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोकणातील समाज बांधवांच्या व्यथा जाऊन घेतल्या यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर ,रामचंद्र महाराज शिंदे, धनगर समाज कोकणचे युवा नेते प्रशांत आखाडे, मंगेश गोरे, समीर आखाडे, कृष्णा ढेबे, सुनील ढेबे, सुनील गवळी, पप्प्या आखाडे आदीसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होतेे.

- Advertisment -