कोरोनाच्या पार्श्व् भूमीवर लोक प्रतिनिधीकडून नियमांचे उल्लंघन…..

0
197

मावळ दि.10: मावळातील लोकप्रतिनिधीकडून वारंवार कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दृष्य दिसत आहे. त्याच पार्श्व् भूमीवर वाकसई याठिकाणी दि.8 जागतिक महिला दिनाच्या दिवशी करण्यात आलेल्या कार्ला प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या भूमी पूजन समारंभात लोक प्रतिनिधीनी आपत्ती व्यवस्थापनाचे नियम लक्षात न घेता.

विनाकारण जत्रा भरल्याप्रमाणे गर्दी करून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडविल्याचे दृष्य स्पष्टपणे दिसून आली. तोंडाला मास्क नाही, सॅनिटायझरचा वापर नाही व सोशल डिस्टंसिंग नाही हे सर्व पाहता लोक प्रतिनिधिना कोरोनाचा विसर पडलेला दिसून येत आहे.

कुठल्याही सोहळ्याची परवानगी पोलिसांकडून घेणे बंधनकारक आहे.शिवाय सोहळ्यावेळी उपस्थितांनी व आयोजकांनी पूर्ण खबरदारी घेणे गरजेचे असताना याठिकाणी कोणतीही खबरदारी घेतलेली दिसत नाही.मग अशा आयोजकांच्या विरोधात काही कारवाई होईल का?