Saturday, July 27, 2024
Homeपुणेमावळकोरोनाच्या विळख्यात सापडला सामान्य माणूस..

कोरोनाच्या विळख्यात सापडला सामान्य माणूस..

“पत्रकार, संतोष पवार”

कोरोनाचा प्रादुर्भाव जसा जसा वाढत आहे.तसा तसा सामान्य माणुस कोरोनाच्या विळख्यात जास्त प्रमाणात अडकला जात आहे.कोनाच्या नोकऱ्या जात आहेत.खुप कठिण काळातुन सामान्य माणुस सध्या दिवस काढत आहे.सामान्य माणसांनी घेतलेले लोन असेल, किंवा त्याच घरभाड असेल याची वसुली अगदी जोराने सुरू केली आहे.सरकारणे ३१ ऑगस्टपर्यंत लोनवरील ईएमआए नाही भरले तरी चालतील असे जाहीर केले होते.परंतु बँकांनी, फायनांस, कंपन्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

सरकारणे सध्या जनतेला वाऱ्यावर सोडले आहे.फायनांसची वसुली अगदी जोरात चालु आहे.त्यामुळे सामान्य माणसाला कोरोनाचा सामना करता करता या इतर गोष्टींचा देखील सामना करावा लागत आहे.शेतकऱ्यांनी पेरण्यासाठी घेतलेल बियाण उगवत नाही.शेतकऱ्यांनी खरेदी केलेले खत बनावट निघतय. एकीकडे हा कोरोना आहेच.

अशा बऱ्याच समस्यांच्या मगरमिठीत सामान्य माणुस अडकत चालला आहे.या कडे शासनाने दुर्लक्ष करु नये.शाळा अजुन व्यवस्थीत चालु नाहीत आणि त्या करु ही नयेत.कोरोनावर औषध येईपर्यंत शाळा या बंदच ठेवाव्यात.काहि खाजगी शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू करून.फि मागण्यास चालु केले आहे.हे देखील चुकिचे आहे.सध्याच्या काळात सामान्य माणसाच जगण मुश्किल झाल आहे. जीवन आवश्यक वस्तू विकणारे भाव वाढवत आहेत.या कडे देखील शासनाने दुर्लक्ष करु नये.

- Advertisment -

You cannot copy content of this page