लोणावळा : कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ऍक्शन मोड मध्ये असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
राज्य शासनाने कोरोनाचा व ओमायक्रॉंन व्हेरिएंटचा वाढता प्रभाव पाहता राज्यात नवीन निर्बंध आजपासून लागू केले आहेत. त्यानुसार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत विनामास्क कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात येत असून सदर मोहिमेत विनामास्कच्या 85 जणांवर कारवाई करून 42,500/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच वाहतूक संदर्भात 15 जणांवर कारवाई करून 14,700/- रुपये दंड वसूल केला आहे.तर आजच्या विशेष मोहिमेत एकूण 100 केसेस करून 56,700/- रुपये एकूण दंड वसूल केला आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून कारवाई करत अशा विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना मास्क वापरन्याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागात पोलीस ध्वनी यंत्रनेमार्फत कोरोनाच्या सूचना व जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली आहे.