Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकोरोना विषाणू संसर्ग काळात उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथील रुग्णवाहिका बंद अवस्थेत ,...

कोरोना विषाणू संसर्ग काळात उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथील रुग्णवाहिका बंद अवस्थेत , वैद्यकीय अधीक्षकांचे दुर्लक्ष..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

कर्जत उपजिल्हा रुग्णालय अनेक गैरसोईमुळे व समस्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे . याविरोधात अनेक पक्ष,संघटनांनी आवाज उठविला अनेक मंत्री येऊन गेले , मात्र रुग्णालया विरोधातील तक्रारी नेहमीच कचऱ्याच्या डब्ब्यात गेल्या.कर्जतकरांच्या सुचनेकडे येथील वैद्यकीय अधिक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने अनेक रुग्णांच्या जीवावर बेतण्याच्या घटना येथे घडलेल्या असताना आत्ता तर कहरच झाला.

ऐन कोरोना विषाणू काळ पूर्वीपासून ते आजपर्यंत येथील रुग्णवाहिका बंद अवस्थेत आहे.त्यामुळे या बंद अवस्थेत असलेल्या रुग्णवाहिका दुरुस्ती कामी दुर्लक्ष करणाऱ्या वैद्यकीय अधिक्षकांवर कारवाई व्हावी,अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


कोरोना विषाणू संसर्ग काळात बाधित रुग्णांना पुढील उपचारासाठी इच्छित स्थळी पोहचण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याने अनेकांना जीवावर बेतले . कर्जत उपजिल्हा रुग्णालयाची हक्काची शासनाने दिलेली रुग्णवाहिका ( एम . एच . 46 के 5038 ) आहे . मात्र गेल्या एक वर्षांपासून ती बंद अवस्थेत आहे .

येथे आलेले रुग्ण अति आजारी असल्यास त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल , नवी मुंबई , मुंबई किंवा ईतर इच्छित स्थळी तातडीच्या उपचारासाठी या रुग्णवाहिकेचा वापर होतो . तर आता या कोरोना काळात या रुग्णवाहिकेचा वापर कोरोना बाधित रुग्णासाठी देवदूतासमान होती.मात्र अनेकांच्या जीवावर बेतण्याच्या घटना येथे घडल्या असताना ही हक्काची रुग्णवाहिका येथील वैद्यकीय अधीक्षकांनी बंद अवस्थेत ठेवून कर्जतकरांना मृत्यूच्या उंबरठ्यावर ठेवले होते.


एक वर्षांपासून बंद पडलेल्या या रुग्णवाहिकेची आत्ता दयनीय अवस्था झाली आहे.तर १०८ व १०२ नंबरच्या रुग्णवाहिकेतून कोरोना बाधित रुग्ण इतर ठिकाणी नेण्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या आदेशाने मनाई आहे.१०२ ही रुग्णवाहिका गरोदर मातांच्या सेवेसाठी आहे.तर १०८ नंबरची रुग्णवाहिका बेभरोशी असल्याची अनेकांची तक्रार आहे.त्यामुळे खितपत पडलेल्या रुग्णवाहिकेची जबाबदारी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांची असल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची मागणी नागरिकांमधून व छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page