कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई आयोजित “आई एकविरा चषक 2022” ही क्रिकेट स्पर्धा लोणावळ्यात संपन्न…

0
23

लोणावळा : कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई आयोजित ” आई एकविरा चषक 2022″ चा पहिल्या दिवशी A) गटात संघ गोराई विजेता व उपविजेता संघ वजीरा यांनी बाजी मारली तर दुसऱ्या दिवशी B) गटात विजेता संघ मनोरी आणि उपविजेता संघ चारकोप यांनी बाजी मारली.

सालाबादप्रमाणे यंदाही कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई यांच्या विद्यमाने लोणावळा रेल्वे ग्राऊंड येथे 40 वर्षांवरील खेळाडूंच्या ” आई एकविरा चषक 2022″ या दोन दिवसीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोळी समाजातील 14 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. हि स्पर्धा पहिल्या दिवशी A गट तर दुसऱ्या दिवशी B गट अशी खेळविण्यात आली त्यामध्ये A गटातून उत्कृष्ट खेळी करत गोराई संघाने प्रथम पारितोषिक व वझिरा संघाने दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. दुसऱ्या दिवशी B गटात प्रथम विजेता मनोरी संघ तर दुसऱ्या क्रमांकावर चारकोप संघाने बाजी मारली.


या स्पर्धेचा शुभारंभ उत्तर मुंबई चे खासदार गोपाल शेट्टी, लोणावळा भुशी गाव पोलीस पाटील मोतीराम मराठे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कमिटीचे विश्वस्त अध्यक्ष मुकेश भंडारी, अध्यक्ष भास्कर कोळी, सेक्रेटरी प्रमोद पाटील, सेक्रेटरी किरण वैती, खजिनदार किशोर केणी, खजिनदार संजय भंडारी व कोळी आगरी स्पोर्ट्स कमिटी अध्यक्ष जोसेफ रॉड्रिक्स, कमिटीचे मार्गदर्शक कुमार भंडारी, दिवाकर म्हात्रे, सुहास केणी, अजित भंडारी, महेश पाटील, प्रल्हाद म्हात्रे, डॉ. जयवंत केणी, मनोहर कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच या स्पर्धेला कसलेही गालबोट लागणार नाही याची दखल घेत सर्व खेळाडूंच्या सहकार्याने हि स्पर्धा खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली.

यावेळी आयोजकांच्या वतीने सर्व स्पर्धाकांना सन्मानित करून विजेत्या संघांना चषक प्रदान करण्यात आले. तसेच या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेतून जमा निधीतून लोणावळा येथील मतिमंद मुलांना प्रत्येकी पाच हजार रुपये निधी आर्थिक मदत म्हणून देण्यात आला.

यावेळी आई एकविरा चषक 2022 या स्पर्धेची आयोजक कमिटी, कोळी आगरी एकता समाज मुंबई चे सर्व पदाधिकारी, मार्गदर्शक आणि लोणावळा भुशी गावचे माजी नगरसेवक माणिक मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.