कोविड सेंटर मधील महिला रुग्णांची सुरक्षा धोक्यात,कर्जत भाजप महिला मोर्चा आक्रमक..

0
67

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण अगोदरच मेटाकुटीला आला असताना त्यात कोविड – १९ सेंटर मधील महिला रुग्णांची सुरक्षितता धोक्यात आल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत . मात्र अजूनही शासन – प्रशासन जागे झाले नसून झोपलेल्या यंत्रणेस शुद्धीवर आणण्यासाठी कर्जत भाजप महिला मोर्चाच्या रणरागिणी आक्रमक झाल्या आहेत . आज कोविड सेंटर मधील महिलांची अत्याचारापासून बचाव व सुरक्षा होण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्यात याबाबतीत निवेदन देण्यात आले.

कर्जतमध्ये उपजिल्हा रुग्णालय कर्जत,रायगड हॉस्पिटल,हे कोविड सेंटर आहेत . याठिकाणी कोरोना बाधित रुग्ण उपचारासाठी ऍडमिट केले जातात.सध्या कोरोनाच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे.अशा जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित महिला रुग्णांना ऍडमिट केल्यावर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासन योग्यप्रकारे घेत नसल्यामुळेच त्यांच्यावर अत्याचार झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.
त्यामुळेच झोपलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी व महिलांची सुरक्षा जपण्यासाठी अशा कोविड – १९ सेंटरमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची गरज आहे ,२४ तास महिला कॉन्स्टेबलची नेमणूक असणे , व रात्रीच्या वेळेस कोविड सेंटरमध्ये गस्त घालणे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत . या समस्या गंभीरपणे घेणे गरजेचे असल्याने शासन – प्रशासन मात्र दुर्लक्ष करून महिलांची इज्जत धोक्यात आणत आहेत,यावर ताबडतोब यंत्रणा राबवून महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडावी,अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा कर्जत भाजप महिला मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

सदरचे निवेदन कर्जत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जोगदंड यांना देण्यात आले , याप्रसंगी कर्जत भाजप तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ . स्नेहा सुनील गोगटे ,गायत्री परांजपे , मनीषा अथनिकर , छाया कुलकर्णी , नगरसेविका विशाखा जिनघरे , नगरसेविका स्वामींनी मांजरे , लीना गांगल , सरस्वती चौधरी , दीप्ती वाडकर ,माजी नगरसेविका बिनीता घुमरे , आदी भाजपाच्या महिला रणरागिणी उपस्थित होत्या , तसेच महिलांचा ज्वलंत प्रश्न असल्याने माजी नगराध्यक्षा सौ . रजनीताई गायकवाड या देखील निवेदन देण्यास सामील झाल्या होत्या .